Posts

झेलमचे युद्ध ! (BC 326)

Image
झेलमचे युद्ध  ! Battle of Hydaspes River ! प्रास्ताविक: मी जेव्हा"भारतीयांचे अपमानास्पद पराभव" ही लेखमालिका लिहायला घेतली तेव्हा अनेकांनी विचारणा केली की भारतीय सेनानींच्या अनेक विजयगाथा इतिहासात घडलेल्या असताना नेमका पराभवांचा इतिहास जगापुढे मांडून मला काय साध्य करायचेय? अशी नकारात्मक विचारसरणीच उन्नतीस बाधक ठरते वगैरे. विजयापेक्षा पराजय अधिक शिकवून जातात असे मी मानतो आणि हेच माझे या प्रश्नास उत्तर असेल. असो. मागील भागात आपण मराठे आणि इंग्रज यांच्यातील खडकीच्या लढाईची माहिती आपण घेतली. पण आज आपल्याला जवळपास २३२६ वर्षे मागे झेलम नदीच्या तीरी जायचे आहे. आपण आज पाहणार आहोत अलेक्झांडर उर्फ सिकंदर ( यापुढील लेखात याचा उल्लेख बहुतांश वेळा "अलक्षेन्द्र" असा असेल) आणि पौरस यांच्यातील इ. स. पूर्व ३२६ सालच्या जून मध्ये झालेल्या भीषण रणसंग्रामाकडे. जसे पानिपतचे तिसरे युद्ध समजायचं तर अहमदिया करार समाजाला पाहिजे तसचं मुळात ग्रीस मधील म्यासेडोनीया चा अलक्षेन्द्र आणि भारतातील पौरस यांच्या त भांडणे होऊन युद्ध होण्याचे कारणच काय हे प्रथम समजून घेतले पाहिजे. त्यासाठी थोडे आपण म्या